पनवेल महानगरपालिका वेबलिंकव्दारे नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण
जाहीर आवाहन
पनवेल महानगरपालिकेमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची सध्याची आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी टेलिफोनिक आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये नागरिकांच्या मोबाईलवर 022-35155022 या दूरध्वनी क्रमांकावरून फोन येत असून सध्याच्या आरोग्य स्थितीविषयी प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांची उत्तरे होय असेल तर एक नंबर आणि नाही असेल तर दोन नंबर दाबून द्यायची आहेत.
याशिवाय महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्य सर्वेक्षणासाठी एक वेबलिंक https://forms.gle/Q52Keiea7XokLRLPA प्रसारित केली असून नागरिकांनी या वेबलिंक वर जाऊन आपली आरोग्यविषयक माहिती त्यामध्ये नोंदवावयाची आहे, जेणेकरुन आपण कोरोनाशी देत असलेल्या लढ्याला निश्चित दिशा मिळणार आहे व वैदयकीज्ञ उपचाराचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे असे आवाहन पनवेल महानगरपालिका चे आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.