शासनाच्या निर्णयाला केराची टोपली,  विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी…

पनवेल पुरवठा विभागाने रास्त धान्य दुकानदाराना वेठीस धरत जबरदस्ती करत तीन महिन्याची एकत्रित केला चलन भरणा

शासनाच्या निर्णयाला केराची टोपली,  विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी

कळंबोली / प्रतिनिधी:

शासनाने एक महिन्याचे धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला असताना पनवेल तहसिल पुरवठा विभागाकडून मनमानी करत रास्त धान्य दुकानदाराना वेठीस धरण्यात आले आहे . या रास्त धान्य दुकानदाराकडून  तीन महिन्याचा एकत्रीत धान्य रकमेचा भरणा  ( चलन भरणा ) केल्याने काही दुकानदार मेटाकुटीला आले असून या कार्यालयाच्या मनमानी कारभारा विऱोधात नाराजी व्यक्त केली आहे.

देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले असून  या जैविक युद्धासी लढण्यास देश सज्ज आहे. कोरोनाच्या विषाणूवर मात करताना देशात राज्यात संचारबंदी व लाँकडाऊन करण्यात आले आहे . त्याला जनतेतून उस्त्फुर्त प्रतिसाद मिळत असून लोकांनी घरात बसणेच पसंत केले आहे. असा लाँकडाऊन व संचारबंदीच्या काळात देशातील कोणताही नागरिक उपासी राहू नये म्हणून केंद्र सरकाने तीन महिन्याचे धान्य मोफत दिले आहे. परंतू ते धान्य अद्याप वितरण झाले नसून राज्य सरकारकडून रास्त दुकानदारांना प्रत्येक महिन्याला सरकारच्या कोठ्यातील चलन भरून रेशनकार्डवर वितरित होणारे धान्य देण्यात आले आहे. राज्य सरकाने लाँकडाऊनच्या सुरुवातीला एप्रिल ते जून या तिन महिन्याचे धान्य एकदाच वितरित करण्याची घोषणा केली होती.तीन महिन्याचे धान्य एकदाच वितरित केल्यास अनेक अडचणी येतील. काही लोक तीन महिन्याचे धान्य घेवून विकतील. त्यामुळे पुन्हा लोकांपुढे धान्याची मोठी समस्या येवू शकते. त्याचप्रमाणे तीन महिन्याचे धान्य साठविण्यास दुकानदारांसमोर मोठी अडचण येवू शकते. याचा दुरदुष्टीने विचार करून राज्य सरकाने ३१ मार्च रोजी तीन महिन्याचे धान्य वितरणाचा  निर्णय मागे घेत एक महिन्याचे धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऱाज्य शासनाचा एक महिने धान्य वाटप करण्याचा निर्णय असताना त्याला हरताल फासत पनवेल तहसिल पुरवठा विभागाचे अव्वळ कारकून यांनी मनमानी करत रास्त धान्य दुकानदाराना वेठीस धरत तीन महिन्याचा एकत्रित धान्य रकमेचा भरणा केल्याने दुकानदार मोठा अर्थिक संकटात आला आहे. कोरोनाच्या आणिबाणीच्या परिस्थितीत तीन महिन्याची भरल़ेली रक्कम जमा होताना दुकानदारांच्या नाकी नऊ येणार आहे . पनवेल तहसिल पुरवठा विभागाच्या हम करोसो कायदा या कारभारावर रास्त धान्य दुकानदारानी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या अव्वळ कारकाना विरोधात अनेक तक्रारी असून त्यांनी एजंटही कार्यरत केले असल्याचे समजते.

फोटो: पनवेल तालुका शिवसेना संघटक, रास्त धान्य दुकान न किरकोळ राँकेल विक्रेता असोसिएशन तालुका अध्यक्ष भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *