महापौर निधीत मदतीचा ओघ सुरू

पनवेल दि.7 एप्रिल 2020

मा.महापौर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या महापौर निधीत विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी त्यांच्या सर्व 29 सदस्यांचे एक महिन्याचे मानधन जमा करून आदर्श उदाहरण दर्शविले. संकटसमयी राजकीय प्रगल्भता दाखवून प्रशासनास सहकार्य करण्यासाठी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन श्री.प्रीतम म्हात्रे यांनी या प्रसंगी दिली. प्रत्येकी १०,०००₹ प्रमाणे एकूण २ ,९०,०००₹ मानधन महापौर निधीत जमा करणारे प्रथम देणगीदार विरोधी पक्षनेते श्री.प्रीतम म्हात्रे व त्यांचे सदस्य ठरलेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अन्य दानशूर व्यक्तींनी देखील कोरोनाशी लढाई करण्यासाठी घरात राहून व social distancing पाळून सहकार्य करावे असे आवाहन मा.आयुक्त गणेश देशमुख यांनी केले.
पनवेल मनपा क्षेत्रात जर योग्य ठिकाणी मदत पोहोचवायची असेल तर खालील बँक खात्यात रक्कम पाठवावी असे आवाहन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

PANVEL MAHANAGARPALIKA MAYOR RELIEF FUND
महापौर सहाय्यता निधी
बँक ऑफ इंडिया
शाखा :- पनवेल, रायगड
खाते क्रमांक :- 121210110020345
IFSC Code :- BKID0001212

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *