CISF जवानांन बाबत मनपा आयुक्त गणेश देशमुख यांचा पणवेलकरांना मोठा दिलासा …

पनवेल: प्रतिनिधी

आताच आलेल्या माहिती नुसार पनवेल महानगरपालिका हद्दीत वास्तव्यास असलेल्या तब्बल ११ सी.आय.एस.एफ.च्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली होती. यापैकी उर्वरित १४१ जवानांचा कोविड 19 अहवाल निगेटिव्ह आल्याने पनवेलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात दिनांक ४/४/२०२० रोजी शनिवारी माहिती दिली. यापैकी कोरोनाग्रस्त ५ जवान हे कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ६ जणांवर कोविड 19 उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे उपचार करण्यात येणार आहेत. १४१ जवानांना होम क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापैकी १२० जण हे कळंबोली येथील सीआयएसएफच्या संकुलात आरोग्य विभागाच्या निगराणीत राहणार आहेत. तर उर्वरित २१ जण खारघर येथील ग्रामविकास भवनातील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये थांबणार आहेत. पुढील १४ दिवस पालिका या सर्व जवानांवर लक्ष ठेवणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *