एम जी एम रूग्णालयाला एक हात मदतीचा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे रक्त दान
पनवेल दि.06 (वार्ताहर): कोविड 19 विरोधी लढताना संपुर्ण शासन स्तरावर विविध प्रयत्न केला जातो आहे. रायगड जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय पनवेल व एम जी एम रूग्णालय ही कोविड19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या रुग्णालयात आता मोठ्या प्रमाणात कोरोणो रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच अन्य रुग्ण उपचार घेत आहेत देशभरात सध्या लाॅकडाऊन असल्याने विविध ब्लड बॅंक बंद असल्याने रुग्णालयात रक्ताची कमतरता भासू लागली आहे.
त्यामुळे कळंबोली येथील एम जी एम रुग्णालयाने रक्ताची तातडीने गरज भासत असल्याने विविध सामाजिक संस्थांकडे पत्रव्यवहार करून आम्हाला रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त पुरवठा करा अशी मागणी केली आहे त्यानुसार त्या च्या मागणीची तातडीने गरज लक्षात घेऊन खांदा वसाहतीतील डाॅ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाने बुध्दजयतीचां सामाजिक कार्यक्रम म्हणून तातडीने रक्त दान शिबीराचे आयोजन केले या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला सोशल डिस्टस ठेवत जवळ जवळ 50 ते 60 लोकांनी रक्तदान केले एम जी एम स्टाफ व बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्याम लगाडे, सचिव महेंद्र कांबळे, खजिनदार संदिप भालेराव, कार्याध्यक्ष महादेव वाघमारे, रमेश गायकवाड, सदस्य अनिकेत भंडारे, गोपीचंद खरात, संदिप डोंगरे आदी उपस्थित होते. मुकुंद रोटे तसेच या कार्यक्रमाला श्री साई सदन सोसायटीचे अध्यक्ष श्याम डिंगळे तसेच साई कृपा क्लीनिक उपलब्ध करून देणारे डाॅ. अमित शिणगारे यांनी आपले सामाजिक योगदान दिले. खांदा वसाहतीमधील बांधवाना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देवून घरीच राहून सुरक्षित बुद्ध पोैर्णिमा साजरी करुन खीर वाटप करावी असे आवाहन करण्यात आले.