प्रथम पुण्यतिथीनिमित्त 200 च्या वर नागरिकांना करण्यात आले अन्नदान ; कौतुकास्पद उपक्रम

पनवेल, दि.29 (वार्ताहर) : प्रथम पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्याबरोबर आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा आहे. हे जाणून वडघर येथे राहणारे चंद्रकांत वेळासकर तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचे सख्खे आतेभाऊ कै.विकास दामू वेळासकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त वडघर परिसरातील 200 च्या वर नागरिकांना अन्नदान करून वेगळ्या प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने मोलमजुरी करणार्‍या नागरिकांना दोेन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. अशा वेेळी आपले दुःख बाजूला सारुन चंद्रकांत वेळासकर यांनी आपल्या बंधूच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांचे आते भाऊ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वडघर येथील कॉलेज फाटा परिसरात असलेल्या गोरगरीबांना आज अन्नदान केले. त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी व त्यांचे सांत्वन करण्यासाठी पनवेल तालुक्याचे आ.प्रशांत ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, शेकाप नेते काशिनाथ पाटील, जे. एम. म्हात्रे यांचे पुत्र सचिन म्हात्रे, उद्योजक राजूशेठ ठकेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ डेमोक्रेटीक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे आदींनी भ्रमणध्वनीद्वारे वेळासकर व साळुंखे कुटुंबियांचे सांत्वन केले. सदर अन्नदानाच्या उपक्रमामध्ये वडघर जिल्हा परिषद मराठी शाळेच्या उपसभापती सौ. सोनाली महेश साळुंखे, गीता चंद्रकांत वेळासकर यांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *