माणसातल्या माणुसकीचा देव* आदितीताई तटकरे
काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांचे विशेष प्रयत्न
कळंबोली/ प्रतिनिधी
खारघर येथील श्री दगडू कोळी यांची पत्नी सौ. मंगळ कोळी या गेली तीन वर्षापासून मुत्रपिडाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांचे डायलिसीस चालु आहे पण लाँकडाऊन असल्याने हाताला काम नाही पैसे नाहीत घरात अन्न नाही त्यामुळे आत्महत्येच्या विचारात असलेल्य दगडू कोळी यांनी सोशल मिडिया वर भावनिक आवाहान केले होते त्याला पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी साद देत जिल्ह्याच्या पालकमंत्री व राज्याच्या मंत्री अदितीताई तटकरे यांना मदतीसाठी साकडे घातले असता त्यांनी संपुर्ण खर्चाचा ओझा घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व स्तरातून आदितीताईवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दगडु कोळी हे आपली धर्म पत्नी श्रीमती मंगल कोळी व दोन मुलासह खारघर गावात राहत आहेत. त्यांची पत्नी मंगळ या गेली 3 वर्षापासून मूत्रपिंड च्या विकाराने आजारी आहेत. त्यांचे डायलासिसवर जीवन अवलंबून आहे. त्याना सात दिवसातून डायलासिस करावं लागतं पण lockdown असल्याने काम नाही पैसे नाहीत, घरात रेशन नाही, औषधेही नाही अश्या परिस्थिती दगडू कोळी यांनी आत्महत्येचा विचार केला होता. पण समोर दोन मुलं सतत येत असल्याने आत्महत्या करण्याची हिंमत झाली नाही. शेवटी मदतीच आवाहान सोशियल मीडिया मध्ये केले ही पोस्ट काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आर सी घरत यांनी पाहीली व त्यांनी मला मदत करण्याचे आदेश सुदाम पाटील यांना दिले. पाटील यांनी खारघर मधील काँग्रेसचे पदाधिकारी सुनिल सावर्डेकर यांना रात्रीच त्यांच्या घरी पाठवून कोळी परिवाराला धीर देण्यास सांगून आम्ही सकाळी येतो . त्याप्रमाणे सुदाम पाटील यांनी आज ( दि १३ ) सकाळी जीवनावश्यक वस्तू कोळी यांच्याकडे सपु्र्द करून 108 नंबर वरील हेल्पलाईन ला कॉल करून ambulance बोलावून सदर पेशन्ट ला कामोठे MGM ला अडमिट करण्यात आले आहे.
त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सुदाम पाटील व आर सी घरत यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु आदीतीताई तटकरे यांना मदतीसाठी साकडे घातले त्यांनी स्वतः MGM हॉस्पिटल, कामोठे* व्यवस्थापन सोबत भ्रमणध्वनी वरून चर्चा करून सर्व खर्चाची बाजू उचलण्याची विनंती केली त्याची दखल घेत लागलीच हॉस्पिटल व्यवस्थापनाने सहकार्य करण्यासाठी सहमती दर्शविली. आदितीताईच्या रुपाने माणसातील माणुसकीचा देव जागा होवून आज सौ. मंगळ कोळी यांना नवीन जीवन मिळाले.