कोळी बांधवांना मिळाली नुकसान भरपाई.

पारंपरिक मच्छीमार कृती समितीला यश

कोळी बांधवांना मिळाली नुकसान भरपाई.

उरण दि 15(विठ्ठल ममताबादे)
गेली अनेक वर्षे न्हावा-शेवा सिलिंकचे काम समुद्रामध्ये सुरू आहे. त्यामध्ये गव्हाण, हनुमान कोळीवाडा,बेलपाडा, उरण आदी गावातील लोक प्रकल्पबाधीत होत आहेत. या लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पारंपारिक मच्छिमार कृती समितीचे सदस्य व गव्हाण गावच्या मच्छिमार सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत कोळी व त्यांचे सहकारी रमेश कोळी,रामदास कोळी,दिलीप कोळी, भरत कोळी, रमाकांत कोळी, कृष्णा कोळी यांच्यासह इतर सहकारी यांनी आपली सर्व कामे सोडून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि आज त्यांच्या मेहणतीला यश आले.महाराष्ट्र शासनातर्फे प्रकल्प बाधित कोळी बांधवांना प्रत्येकी कुटुंब 1, 88, 000 रुपयाचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे.प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये इतके नुकसान भरपाई शासनातर्फे कोळी बांधवांना मिळणार आहे.

पारंपरिक मच्छीमार कृती समिती आजमितीला समाजाचा उत्कर्ष व्हावा यासाठी जे.एन.पी.टी. प्रशासन व इतर केंद्र सरकारच्या कंपनी बरोबर मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे केस दाखल करुन कोळी समाजावर होणा-या अन्यायाची व्यथा न्यायालयात मांडून ते प्रकरण अंतिम चरणात आणले आहे. या समितीने कोळी बांधवाना न्याय मिळवून दिल्याने कोळी बांधवाने या समितीचे संबंधित पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले आहे.

गव्हाण कोळीवाडा 1062, हनुमान कोळीवाडा 250, बेलपाडा कोळीवाडा 100,
उरण कोळीवाडा 99 असे विविध कुटुंब प्रकल्पबाधितांना शिवडी ब्रिज प्रकल्प अंतर्गत नुकसान भरपाई मच्छीमारांच्या खात्यात जमा झाले आहेत. पहिला हप्ता मिळाला असून इतर रक्कम टप्प्या टप्प्याने प्रकल्प बाधितांना मिळणार आहे.

पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीने गेली 14 वर्षे मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी जोरदार प्रयत्न करत अनेक विजय मिळविले आहेत. मानवी अधिकार, हायकोर्ट एन जी टी कोर्ट अश्या अनेक ठिकाणी मच्छीमारांचे प्रश्न मांडून त्यावर विजय मिळविण्याचे काम पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीने केले आहे. न्हावा शिवडी ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पामध्ये एन टी जी या कोर्टाच्या आदेशाचा विचार करून मच्छीमारांना गेल्या दोन वर्षांपासून नुकसान भरपाई देण्यास सुरवात झाली. आणि गव्हाण कोळीवाडा, हनुमान कोळीवाडा, उरण कोळीवाडा, बेलपाडा कोळीवाडा या चारही कोळीवाड्यांना मोठया संख्येने नुकसान भरपाई मध्ये पात्रता मिळवून दिली असे कृती समितीचे सदस्य मनोज कोळी यांनी यावेळी आमचे उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे यांच्याशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *