पनवेल अर्बन बँक निवडणूक; भाजपप्रणित उत्कर्ष पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद
शेकाप- राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर; शेकापला करावा लागतोय मतदारांच्या नाराजीचा सामना

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित उत्कर्ष पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली असून महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला प्रतिसाद लाभला. भाजपप्रणित उत्कर्ष पॅनल विजयी झाल्यानंतर अर्बन बँकेचे पूर्वीचे वैभवाचे दिवस पुन्हा येतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
या प्रचार रॅलीत भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, निता माळी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, खजिनदार संजय जैन, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, चिटणीस चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, प्रभाग क्रमांक १९चे अध्यक्ष पवन सोनी, मनोज आंग्रे, मोतीलाल जैन, नितीन मुणोथ, श्यामनाथ पुंडे, कुणाल जैतपाल यांच्यासह उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.


या वेळी शहरातील जय भारत नाका, विरूपाक्ष मंदिर, गावदेवी मंदिर, भगत आळी, लाइन आळी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, कापड गल्ली, मिरची गल्ली, मोहल्ला, रोहिदास वाडा, एम. जी. रोड या विभागातील मतदारांना प्रत्यक्ष भेटून उत्कर्ष पॅनेलच्या उमेदवाराांन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
एकूण १३ जागांसाठी पनवेल अर्बन बँकेची निवडणूक होत असून यात सर्वसाधारण आठ, महिला प्रतिनिधी दोन आणि अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या निवडणुकीकरीता २७ नोव्हेंबरला मतदान, तर २८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.


भाजपप्रणित उत्कर्ष पॅनेलकडून सर्वसाधारण जागेसाठी अजय यशवंत कांडपिळे, बळीराम नारायण म्हात्रे, यतीन शशिकांत देशमुख, श्रीनंद मुकुंद पटवर्धन, भगवान तुकाराम मुकादम, असिफ हसन करेल, कृष्णा सीताराम पाटील, भगवान शंकर पाटील, महिला प्रतिनिधी म्हणून प्रमिला जयराम मुंबईकर, निकिता निवृत्ती नावडेकर, अनुसूचित जाती जमाती जागेसाठी महेंद्र जानू गायकवाड, इतर मागासवर्गीय जागेसाठी प्रल्हाद गोविंद केणी, भटक्या विमुक्त जमाती जागेसाठी सुहासिनी दिनेश केकाणे हे उमेदवार आहे. या उमेदवारांची विमान हि निशाणी असून त्यांना मतदारांचा प्रतिसाद लाभत आहे.

चौकट-
गेल्या ३० वर्षांपासून पनवेल अर्बन बँकेवर शेकपक्षाची सत्ता राहिली आहे. मात्र दीर्घकाळ सत्ता असतानाही या बँकेचा शाखा विस्तार आणि विकास अद्यापही झाला नाही. त्यातच शेकाप आता महाविकास आघाडीमध्ये असल्याने हि निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढत असताना शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. तसेच बँकिंगच्या दृष्टिकोनातून ग्राहकांना सोयीसुविधा मिळत नाही. त्यामुळे शेकापला मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *