संविधान दिनानामित्त महापालिकेत विविध कार्यक्रम
महापालिका शाळांमध्ये ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा
पनवेल,दि.२६ : पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज (२६ नोव्हेंबर) ‘संविधान दिनानिमित्त’ भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमास आस्थापना विभाग प्रमुख नामदेव पिचड,सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, परवाना विभाग प्रमुख जयराम पादिर , भांडार विभाग प्रमुख प्रकाश गायकवाड, पालिका कर्मचारी उपस्थित होते.
तसेच पनवेल महापालिकेच्या ११ शाळांमध्ये ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये विदयार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्ये स्पर्धा इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
पालिका शाळा क्र.७, तक्का मराठी शाळेला शिक्षण विभागाचे प्रमुख श्री. बाबासाहेब चिमणे यांनी भेट दिली. त्यांनी या दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच संविधानाच्या प्रतीचे पूजन करून उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेण्यात आले.
यावेळी त्यांनी संविधान दिनाचे महत्त्व, संविधान म्हणजे काय, संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार, याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.