सुमारे १०० ग्रॅम वजनाचे ४,५०,५०० – रू .किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पाठलाग करून पकडले….

वडखळ पेण येथुन जबरीने चैन खेचुन पळुन जाणा – या सराईत गुन्हेगारास नवी मुंबई हद्दीमध्ये दोन तासात मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी थरारक पाठलाग करून शिताफीने पकडले आज दिनांक २२/०५/२०२० रोजी दुपारी १३:०० वाजताच्या सुमारास वडखळ पोलीस ठाणे, रायगड यांनी मध्यवर्ती कक्षास माहिती दिली की, एनएस मोटार सायकल क्रमांक- MH 02 ER 2885 यावरील इसमाने वडखळ पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचींग करून तो नवी मुंबईच्या दिशेने येत आहे अशी माहीती दिली . मिळालेल्या माहितीवरून मध्यवर्ती कक्षाचे वपोनि / कोल्हटकर यांनी क्षणाचाही विलंब न करता सपोनि / राजेश गज्जल, पोना / सचिन धनवटे, पोना / नवनाथ कोळेकर असे पथक तयार करून त्यांना सुचना देवुन बेलापूर किल्ला जंक्शन या ठिकाणी सापळा लावला. काहि वेळाने सदर मोटार सायकल वेगाने उलवे बाजुकडून येवुन बेलापुर किल्ला जंक्शनवरून पामबिच रोडला वळताना दिसली. सदर मोटारसायल स्वाराचा पामबीच रोडने थरारक पाठलाग करून कोपरीगाव वाशी, येथील पेट्रोल पंपाजवळ त्यास पुरेशा बळाचा वापर करून शिताफीने मोटार सायकल सहित ताब्यात घेतले. ताब्यात घेलेल्या इसमाचे नाव- अफजल अकबर मस्ते, वय -३० वर्षे, पत्ता- ख्वाजा बिल्डींग, ७ मजला, शिपलीनगर, मुंब्रा ठाणे असे आहे. त्याचे ताब्यात वडखळ येथे जबरीने चोरलेले अंदाजे सुमारे १०० ग्रॅम वजनाचे ४,५०,५००/ – रू . किंमतीचे तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र मिळुन आले आहे. नमुद इसमाकडे केलेल्या चौकशीत त्याचेवर नवी मुंबई, मुंबई परिसरात वैन जबरी चोरीचे एकुण १ ९ गुन्हे दाखल आहेत . सदर आरोपीकडे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये चैन जबरी चोरी गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली . काही वेळाने वडखळ पोलीस ठाण्याचे पथक हजर झाल्याने पुढील कायदेशीर कारवाई साठी त्यास त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे . सध्या वालु असलेल्या कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये नवी मुंबई पोलीस अतिशय व्यस्त असतानाही वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर , सहा.पोलीस निरीक्षक राजेश गज्जल , पोजा / सचिन धनवटे , पोना / नवनाथ कोळेकर , नेमणुक – मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *