आदित्य परेश ठाकूर यांनी केले वाढदिवसानिमित्त पिगी बँकेतील साठवलेले पैसे महापौर निधीत जमा

पनवेल / प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आदित्य परेश ठाकूर यांनी आपल्या नवव्या वाढदिवसानिमित्त स्वत:च्या पिगी बँकमध्ये जमा झालेले दोन हजार चारशे सत्तर रुपये पनवेल महापालिकेच्या महापौर निधीत जमा करुन समाजाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.करोना विषाणूचे थैमान दिवसेंदिवस रुद्र स्वरूप धारण करत आहे. पनवेल महापालिकेसह पनवेल तालुका सुद्धा रेड झोन मध्ये समाविष्ट झाला आहे.

कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा दिवसेदिवस वाढत असून, कोविड योद्धे प्राणपणाने विषाणूंचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लढत आहेत. त्यापार्श्‍वभुमीवर पनवेल महापलिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांनी ज्यांना मदत करायची आहे त्यांनी महापौर सहाय्यता निधी रक्कम जमा करावी आसे आवाहन केले होते. या आवाहनाला अनेकांनी प्रतीसाद दिला असून, आदित्य परेश ठाकूर यांनी आपल्या नवव्या वाढदिवसानिमीत्त स्वतःच्या पिगी बँकमध्ये जमा झालेले पैसे महापौर सहायत्ता निधीमध्ये जमा केले असल्याने इतक्या लहान वयात समाजाप्रती असलेली भावना जपल्याचे एक चांगले उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *