मनसे शाखा नविन शेवा तर्फे स्मशानभूमी समोर सुशोभिकरण.

मनसे शाखा नविन शेवा तर्फे स्मशानभूमी समोर सुशोभिकरण

उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा नविन शेवा यांच्या संकल्पनेतून नविन शेवा स्मशानभूमी समोर सुशोभिकरण करण्यात आले.यामध्ये नागरीकांना बसण्यासाठी बँचेस बसविण्यात आले आहेत व पाण्याची टाकी लाऊन पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.सुशोभिकरणाचे उदघाटन ग्रामपंचायत महिला सदस्य व सर्वपक्षीय महिला पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन प्रसंगी गावचे ग्रामसुधारणा मंडळ अध्यक्ष कमळाकर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत म्हात्रे, पोलिस पाटील मनोहर सुतार व ग्रामस्थ उपस्थित होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवीन शेवाच्या माध्यमातून नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या सामाजिक उपक्रमाला जनतेचाही नेहमी उत्तम प्रतिसाद लाभत असतो.स्मशान भूमी समोर सुशोभीकरण करून तसेच पाण्याची व्यवस्था करून मनसेने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.मनसेने केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.