रिक्षा स्टॅन्ड उपलब्ध करून न दिल्यास मनसे करणार आंदोलन.

रिक्षा स्टॅन्ड उपलब्ध करून न दिल्यास मनसे करणार आंदोलन

उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )उरण शहरात रिक्षा चालकांची संख्या भरमसाठ वाढली असून रिक्षा चालकांना रिक्षा लावायला जागाच (स्टॅन्ड )नसल्याने रिक्षा चालक त्रस्त झाले आहेत . शासनाने रिक्षा चालकांसाठी, रिक्षा लावण्यासाठी जागेची व्यवस्था न करता भरमसाठ परवानगी देत शासन सुटले आहे. याविषयी रिक्षा चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उरण चारफाटा येथे अनेकदा ट्रॅफिक पहावयास मिळते.दर रविवारी तर फुल ट्रॅफिक जाम पाहावयास मिळते. वाहनाना येण्या जाण्यासाठी रस्ताच नसतो. चारफाटा येथे बेकायदेशीर, अनिधिकृत दुकाने, टपऱ्या हातगाड्या यांचे बस्तान आहे. शिवाय चारफाटा येथे दर रविवारी आठवडा बाजार भरत असतो. तोही बेकायदेशीर. या आठवड्या बाजरा मुळे ट्रॅफिक जाम होतो. मात्र या बाबीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत बेकायदेशीर टपऱ्या, दुकाने, हातगाड्या हटविन्या ऐवजी शासनच त्यांना पाठबळ देत असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे. चारफाटा येथे आपले पोट भरण्यासाठी 5,6 मराठी स्थानिक रिक्षाचालक आपली रिक्षा लावतात मात्र तेथून रिक्षा हलविण्यासाठी सांगितले जाते. आणि त्या जागी मात्र टपऱ्या, हातगाड्या लावले जातात. त्यामुळे स्थानिक मराठी असलेल्या बेरोजगार तरुणांवर अन्याय होत आहे. रिक्षा चालकांकडून वारंवार मागणी करून सुद्धा त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे चारफाटा येथे चालू असलेले अनिधिकृत बेकायदेशीर टपरी, दुकाने, हातगाड्या यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळेच त्यांना परवानगी दिली जाते मात्र यामुळे रिक्षा चालकांवर अन्याय केला जात आहे. यामुळे सर्व रिक्षा चालक त्रस्त झाले आहेत.

सरकारने भरमसाठ रिक्षा परमिट सोडून रिक्षा चालकांवर अन्यायच केले आहे. नगर पालिका किंवा ग्रामपंचायत यांच्याकडे विचारपूस केली की रिक्षा लावण्यासाठी परवानगी दिले जात नाहीत. उरण शहरात किंवा ग्रामपंचायत हद्दीत रिक्षा लावण्यासाठी पुरेशी जागा आहे कि नाही याचा विचार न करता शासन भरमसाठ रिक्षा परमिट सोडत आहे.आणि रिक्षा चालकांना संकटात टाकत आहे. एक प्रकारे भरमसाठ परमिट काढून बेरोजगार युवकांना आणखीन बेरोजगार करण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे.शासनाकडे रिक्षा स्टँडची मागणी करून सुद्धा रिक्षा स्टॅन्ड देण्यास शासन असमर्थ ठरत आहे.चार फाटा उरण येथे मोरा या ठिकाणी जाण्यासाठी साठी 5/6 गाड्या कोणालाही त्रास न देता लावत आहेत तरी त्या गाड्या हटवून तेथे हात गाड्या लावण्यात येतात तर रिक्षा लावल्या तर त्रास होतो आणि हातगाड्या लागल्या तर त्रास होत नाही का ? हा रिक्षा चालकांवर अन्याय होत आहे तरी मोरा रिक्षा चालकांना न्याय पाहिजे अन्यथा मनसे रिक्षा युनियन मनसे पद्धतीने आंदोलन पुकारेल असा इशारा मनसे रिक्षा युनियन उरण मोरा रोडचे अध्यक्ष दिनेश हळदनकर, मनसे नेते संदेश ठाकूर यांच्यासह मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.