तळोजा औद्योगिक वसाहतीतील गॅलेक्सी कंपनीच्या माध्यमातून परशुराम पोवार यांची पनवेलकरांना लाखामोलाची मदत

पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः तळोजा औद्योगिक वसाहतीतील गॅलेक्सी कंपनीमध्ये उच्च पदावर असलेले परशुराम पोवार यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात पनवेल परिसरातील नागरिकांसाठी विविध मार्गाने साधन सामुग्री औषधे व इतर मदत देत एक वेगळा ठसा उमटविला आहे.
पनवेल येथे राहणारे व गॅलेक्सी कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असणारे परशुराम पोवार यांनी आतापर्यंत कंपनीच्या माध्यमातून सामाजिक बांधलकी म्हणून समाजपयोगी उपक्रमांचा कणा म्हणून गरज असेल त्या ठिकाणी शाळा बांधणे, शाळेला संगणकीकरण करून देणे, अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील शौचालय बांधून देणे, ही कामे त्यांनी यापूर्वी केली आहेत. सध्या कोरोना घोंघावतोय आहे.

अशावेळी त्यांनी पनवेलकरांसाठी कंपनी व्यवस्थापनाशी आग्रही यशस्वी बोलणी करून आपल्या पनवेल महानगरपालिकेसाठी कोरोना मदत म्हणुन कंपनी कडुन 1500 पीपीई किट, 405 लिटर सॅनिटायझर, 250 किलो हॅण्ड वॉश, 2000 किलो सोडीयम हायप्रोक्लोेराईंड, 500 फेस मास्क दिले आहेत. तसेच तळोजा पोलीस ठाण्यात 150 लिटर सॅनिटायझर, 100 जीवनावश्यक वस्तूंची पॅकेट, 400 फेस मास्क, कामोठे पोलीस ठाण्यासाठी 120 लिटर सॅनिटायझर, खांदेश्‍वर पोलीस ठाण्यासाठी 125 लिटर सॅनिटायझर, पोलीस उपायुक्त कार्यालयासाठी 340 लिटर सॅनिटायझर, 700 जीवनावश्यक वस्तूंचे किट, त्यामध्ये सर्व महत्वाच्या वस्तू दिल्या आहेत. तसेच अशा प्रकारे ग्रामीण भागातील गरजवंतांना त्यांनी अन्नधान्याचे वाटप केले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापुढे सुद्धा कंपनीच्या माध्यमातून अशाच प्रकारे मदतीचा हात देण्यात येईल असे पोवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *