संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदी लागू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांची मागणी
पनवेल दि. 09 (वार्ताहर)- लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यामंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन लोकहितकारी आदेश व सूचनांचे काटेकोर पालन करीत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तरी हा कोरोना समुळ नष्ट होण्यासाठी संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदी लागू करावी व कोरोनाचा गुणाकार तोडण्याची संधी साधावी अशी आग्रही मागणी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात शिवसेनाजिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी म्हटले आहे की, झपाट्याने गुणाकार करत असलेल्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन जी मेहनत घेते आहे. त्याचे कौतुक करणे महत्वाचे आहे. कोरोना विषाणूच्या कम्युनिटी स्प्रेड या नावाने ओळखला जाणाऱ्या टप्प्यात आपण आता प्रवेश केला असल्याचे वैद्याकीय तज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत आपले आजवरचे प्रयत्न वाया जाऊ न देता जनतेला अधिक सुरक्षित ठेवत कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी किमान संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदी लागू करावी व कोरोनाचा गुणाकार तोडण्याची संधी साधावी अशी आग्रही मागणी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.