शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी राबविला अन्नदान उपक्रम

पनवेल दि. 09 (वार्ताहर)- कोरोना संकटाच्या काळी सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात म्हणून खारघर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे साई मंदिर, बेलपाडा येथे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी अन्नछत्र उपक्रम राबविला असून त्याचा फायदा हजारो गरजवंतांनी घेतला आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाचे खा. श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत अन्नदान उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका कल्पना पाटील, विधानसभा संघटिका, रेवती सकपाळ, महानगर संघटिका शुभांगी शेलार आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *