नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे पनवेल वासियांसाठी सोडियम हायपोक्लोराईट औषधाची मदत

पनवेल दि. 09 (वार्ताहर)- कोरोना विषाणू साथीचा आजार संपूर्ण जगामध्ये पसरला आहे व यामुळे लोकंडाऊन करण्यात आले आहे. पनवेल परिसरातसुद्धा कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. पनवेलकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या सोडियम हायपोक्लोराईट या औषधाची मदत महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे करण्यात आली. त्याचे आज महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी 5 लिटरचे 40 कॅन सुपूर्त केले.

सध्याच्या काळात सोडियम हायपोक्लोराईटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा फायदा पनवेलकरांना व्हावा या दृष्टीने महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 5 लिटरचे 40 कॅन महानगरपालिकेकडे पाठवून दिले. जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी सदर कॅन महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी प्रांताधिकारी दत्तू नवले, उपायुक्त संजय शिंदे आदी उपस्थित होते. या प्रसंगी कामोठे हे पूर्ण प्रकारे कंटेन्मेंट झोन जाहिर केल्याबद्दल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी आयुक्तांचे कौतुक केले. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावा संदर्भात लढा देण्यासाठी पनवेल महानगरपालिका जे हिताचे निर्णय घेईल. या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असेल व आम्ही सर्वतोपरी सहकार्य प्रशासनाला करू असे आश्वासनसुद्धा त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *