जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्या दणक्यानंतर सिडकोने इएमआय व त्यावरील विलंब शुल्क व्याज वसुली करण्यास दिली स्थगिती

पनवेल दि. 07 (वार्ताहर): शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार, प्रकल्पग्रस्तांचे नेते बबन पाटील यांनी सिडको प्रशासनाला दिलेल्या खमखमीत पत्रानंतर सिडकोने इएमआय व त्यावरील विलंब शुल्क व्याज वसुली करण्यास स्थगिती दिल्याने जिल्हा सल्लागार बबन पाटील यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याकडे सिडको इएमआय व त्यावरील विलंब शुल्क व्याज वसुली करत असल्याबद्दल सदर बाब निवेदनाद्वारे त्यांच्या लक्षात आणून देऊन तात्काळ सदर व्याजवसुली थांबवावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार सिडकोने सदर इएमआय व त्यावरील विलंब शुल्क व्याज वसुलीला स्थगिती दिली. कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या संकट काळात देखील कष्टकऱ्यांना त्वरीत न्याय मिळवून दिल्याबद्दल जिल्हा सल्लागार बबन पाटील यांचे शिवसैनिक व अड. अमर पटवर्धन यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून आभार मानले आहेत.

फोटोः बबन पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *