तथागत गौतम बुद्ध ची २५६४ व्या जयंती सोशल डिस्टिंग मध्ये साजरी; गरजू नागरिक रिक्षा चालकाना धान्य वाटप
पनवेल दि. 07 (वार्ताहर): खांदा वसाहत मधील सेक्टर १३ येथील मूलगंध कुटी बुद्ध विहार येथे तथागत गौतम बुद्ध ची २५६४ वी जयंती सोशल डिस्टिंग ठेवून साजरी करण्यात आली. जगाला शांतत संदेश देणारे गौतम बुद्ध पुष्प वाहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करुन आलेल्या धम्म बांधवांनी वंदना घेतली बुध पोर्णिर्मा शुभेच्छा दिल्या.
कोरोना विषाणु मुळे लॉक डाउन अनेकाचे रोजगार गेले रिक्षा चालकाचे व्यवसाय बंद पडले यामुळे मूलगंध कुटी बुद्ध विहार तर्फे प्रत्येकी ५ किलो धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेवक एकनाथ गायकवाड़, सामजिक कार्यकर्ते सुरेश आयरे, बुद्ध विहार अध्यक्ष दिनेश जाधव, कार्यालयीन सचिव चंद्रसेन कांबळे उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी तसेच डी जे जाधव विश्वास भालेराव, राहुल वाघमारे, प्रशांत जाधव उपस्थित होते.
फोटोः मूलगंध कुटी बुद्ध विहार तर्फे करण्यात आले धान्यवाटप