पावणे दोन महिन्यांपासून शिवसेनेच्या वतीने घरोघरी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून जपण्यात आली सामाजिक बांधिलकी
पनवेल दि. 07 (वार्ताहर)- शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार गेल्या पावणे दोन महिन्यांपासून पनवेल विधानसभा १८८ शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यामार्फत संपूर्ण पनवेल तालुक्यात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी अन्नदान, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, मास्कचे वाटप, सॅनिटायझरचे व हॅंडग्लोव्हजचे वाटप आजमितीस सुरू आहे.

पनवेल विधानसभा १८८ शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्याकडून, अन्नदान व अन्नधान्य वाटप तसेच,खारघर शहरात व परिसरातील आदिवासी पाडे ,बेलपाडा गाव तसेच शहर खारघर शहर, खांदा कॉलनी, कामोठा शहर, कळंबोली शहर, पनवेल शहर, नवीन पनवेल शहर, तळोजा तसेच ग्रामीण व पनवेल कोळीवाडा, करंजाडे, आदिवासी पाडे या ठिकाणी आजपर्यंत करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे पनवेल तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागासाठी दररोज अन्नदान सुरू असून ते कोरोना विषाणूचा प्रदूर्भाव संपेपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत 24 तास जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या पोलिसा बांधवांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पोलिस नियंत्रण कक्ष यांना फोरर्व्हीलर गाडी ये जा करण्यास मोफत सेवा म्हणून दोन महिन्यासाठी दिली आहे. तसेच पनवेल तालुक्यातील सुरक्षा रक्षक यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटरी व मासचे वाटप करण्यात आले. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे शहरात अन्नदान ही सेवा चालू आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक गरजवंताला कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते मदत करीत आहेत. या सामाजिक सेवेत त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील,महानगर प्रमूख रामदास शेवाळे ,उपमहानगर प्रमुख दिपक घरत ,तालुका प्रमूख एकनाथ म्हात्रे,खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर, कामोठा शहर प्रमुख राकेश गोवारी,खांदा कॉलनी शहर प्रमूख सदानंद शिर्के,पनवेल शहरप्रमुख अच्युत मनोरे,नविन पनवेल शहरप्रमुख रुपेश ठोंबरे ,तळोजा शहर प्रमूख बाळाराम मुंबईकर आदी पदाधिकारी खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. आज संपूर्ण तालुक्यात शिवसेनेच्या मार्फत अनेक घरांमध्ये तसेच खेड्यांत, आदीवासी पाड्यांवर मदत पोहोचली आहे.
फोटोः शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यामार्फत पोहोचविण्यात आलेली मदत