ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट, माथाडी अँड जनरल कामगार युनियनच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी राजकुमार जैस्वाल यांची नियुक्ती..

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट, माथाडी अँड जनरल कामगार युनियनच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी राजकुमार जैस्वाल यांची नियुक्ती

प्रतिनिधी : संपूर्ण भारतात ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट, माथाडी अँड जनरल कामगार युनियन  कार्यरत असून संघटनेमार्फत जनतेच्या न्यायासाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी एकमेव हक्काची संघटना म्हणून गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मुंबई, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, पुणे, नाशिक, याठिकाणी कार्यरत आहे. युनियनच्या  कामांनी अनेक नवतरुण भारावून गेले असून पक्षीय राजकारणाला कंटाळून अनेक जण युनियन मध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या कोरोना व लॉकडाऊन काळामध्ये युनियनतर्फे  सुरु असलेली कामे पाहता एखाद्या राजकीय पक्षाला देखील लाजवेल असे कामांचे स्वरूप आहे. या कामांचे व संघटनेचे महत्व जाणुन तसेच युनियनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांच्या नेतृत्वात आज नवी मुंबई येथील जेष्ठ समाजसेवक राजकुमार जैस्वाल यांची ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट, माथाडी अँड जनरल कामगार युनियनच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. वाशी नवी मुंबई येथे त्यांना नियुक्ती पत्र देताना युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी, राष्ट्रीय सरचिटणीस श्रेयस ठाकूर, महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रितम निकम, अरमान पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. राजकुमार जैस्वाल हे नवी मुंबई मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.संघटनेचे नियम व वैचारिक पालन करून संघटना मजबूत करण्याचे कार्य आपण कराल. कामगार व माथाडी नियुक्तीचे मध्य समन्वय बनवण्याचे कार्य आपण कौशल्यपूर्ण कराल अशा शुभेच्छा डॉ.मुनीर तांबोळी यांनी त्यावेळी दिल्या. नियुक्ती नंतर राज जैस्वाल  यांनी पत्रकारांसी बोलताना सांगितले की, कामगार , माथाडी, वाहतूक दार यांच्या न्याय हक्कासाठी जन आंदोलन उभे करणार,त्यांच्या पाठीशी उभे राहणार, प्रत्येक राज्यात संघटनेची बांधणी करून कामगारांना न्याय मिळवून देणार.
त्यांच्या नियुक्तीनंतर मित्र परिवार कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *