पनवेल येथे पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम( डिप्लोमा इन जर्नालिझम)प्रवेश सुरू.

पनवेल येथे पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम( डिप्लोमा इन जर्नालिझम)प्रवेश सुरू.

दि 23:
2021-2022 या शैक्षणिक वर्षापासून पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या, मराठी भाषेची गोडी असणाऱ्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम( डिप्लोमा इन जर्नालिझम) प्रवेश करण्यात आला आहे. हा अर्धवेळ अभ्यासक्रम असून शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवसांत चालविला जाणार आहे. माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ पत्रकार या वर्गात मार्गदर्शन करणार आहेत. बारावीनंतर पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी, अन्य ठिकाणी नोकरी करत शिकू इच्छिणारे विद्यार्थी किंवा पत्रकारितेमध्ये करिअर करू इच्छिणारे कोणत्याही शाखेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास पात्र असतील. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वेबसाईटला भेट देऊन प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेतली जाणार असून त्या परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाचे असेल.त्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येतील. या प्रवेश परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. अर्ज करण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज भरून देणे आवश्यक आहे. इच्छुकांनी माध्यम क्षेत्रातील उपलब्ध अनेक व्यावसायिक संधी मिळविण्याच्या दृष्टीने या पत्रकारिता वर्गाला जरूर प्रवेश घ्यावा.चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, न्यू पनवेल (स्वायत्त) या अग्रगण्य शिक्षण संस्थेत त्वरित प्रवेश घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क -नम्रता कडू,
वर्ग समन्वयक,
डिप्लोमा इन जर्नालिझम,7977489076,
ईमेल पत्ता- djnlckt1@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *