बेवारस मृतदेहाच्या नातेवाईकांचे पनवेल पोलिसांकडून शोध..

बेवारस मृतदेहाच्या नातेवाईकांचे पनवेल पोलिसांकडून शोध
पनवेल,(प्रतिनिधी) — पनवेल परिसरातील डी पॉईंट येथील उड्डाणपुलाच्याखाली एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. याबाबत पनवेल पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सदर बेवारस बसुद्ध इसमाला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला होता. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच हा इसम मयत झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. याबाबत पनवेल पोलसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात करण्यात आली आहे. या इसमाचे नाव पत्ता माहिती नाही, अनोळखी फिरस्ता पुरुष इसम वय अंदाजे 35 ते 40 वर्ष, अंगाने मध्यम, उंची 5/2, चेहरा उभट, डोक्याचा व चेहऱ्याचा भाग कुजलेला अंगात नेसून पट्ट्या-पट्ट्याचा हाफ शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट, अश्या वर्णनाचा इसमाची माहिती कोणाकडे असल्यास पनवेल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोरडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *