दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यु…

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यु…
पनवेल दि.21 (वार्ताहर)- पनवेल परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
शहरातील जेएनपीटी-पनवेल रोडवर पाडेघरच्या हद्दीत एका डंपर वाहनचालक श्याम लोणे यांनी कोणतीही योग्य खबरदारी न घेता रस्त्यावर धोकादायकरित्या उभा करून ठेवला असता त्याठिकाणी दुसऱ्या ट्रेलरचा अपघात होऊन ट्रेलरचालक उत्तमकुमार हुल्लुर प्रसाद (वय-34) हा या अपघातात जखमी होऊन मृत्यु पावला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत कळंबोली ते जेएनपीटी हायवे रोडवर छोट्या खांदा गावासमोरील रस्त्यावरून टॅंकरचालक हा भरधाव वेगाने टॅंकर घेऊन जात असताना त्याने होंडा शाईन मोटारसायकलीस समोरून ठोकर मारून झालेल्या अपघातात मोटारसायकलीवरील सदाशिव ठोंबरे (वय-51) हे गंभीररित्या जखमी होऊन मृत्यु पावले आहेत. या अपघाताची नोंद कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *