Covide-19 कोरोना विषाणूमुळे ज्या मुलांचे आई वडील गमावले आहेत, अश्या मुलांना शिक्षणाकरिता महापालिके मार्फत शिष्यवृत्ती देण्यात यावी..

आज पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील Covide-19 कोरोना विषाणूमुळे ज्या मुलांचे आई वडील गमावले आहेत, अश्या मुलांच्या शिक्षणाकरिता महापालिके मार्फत शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा. शिरीष घरत, पनवेल महानगर प्रमुख श्री. रामदास शेवाळे व विधानसभा समन्वयक श्री. प्रदीप ठाकूर तसेच उपमहानगर प्रमुख श्री. दिपक घरत यांनी महापालिके चे आयुक्त मा. गणेश देशमुख साहेब यांना निवेदणाद्वारे केली.

कोरोना विषाणूमुळे ज्या मुलांचे आई-वडील त्यांनी गमावले आहेत. अश्या मुलांच्या १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणा करिता रुपये ७,०००/- शिष्यवृती स्वरूपात देण्यात यावी. कारण मुळातच कोरोनामुळे गेली २ वर्षात जनतेची आर्थिक परिस्थिति खूप बिकट झाली आहे. त्यातच ज्या घरातील Covide-19 कोरोना विषाणूमुळे ज्या मुलांनी त्यांचे आईवडील गमावले आहेत, अशा मुलांसाठी ही योजना चालू करावी.

तसेच अश्या प्रकारची योजना नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या चालू असून, त्याची दखल घेत पनवेल महानगर पालिका क्षेत्रात ही योजना चालू करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *