मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेस कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन…

काँग्रेसच्या एकनिष्ठ व लढवय्या नेत्यांना श्रद्धांजली

मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेस कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन

पनवेल, ता.20 ( प्रतिनिधी ) मुंबई काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत रत्नागिरी काँग्रेस कमिटीचे अध्यक् विजयराव भोसले, अलिबाग विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद बेलोसे या काँग्रेसच्या एकनिष्ठ व लढवय्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या वेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांन तिन्ही दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळेस त्यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष मधू चव्हाण, माजी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी सुहास (भाऊ) जगताप, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशोकराव जाधव, मराठा सेवा संघ चे खेड व रत्नागिरी चे पदाधिकारी केशवराव भोसले, काँग्रेस नेते विजयराव मोरे, मराठा महासंघाचे सरचिटणीस दिलीप जगताप, पेण तालुका काँग्रेस नेते चंद्रकांत पाटील व यशवंत कदम, काँग्रेसचे खेड, दापोली, मंडणगड व गुहागर चे प्रभारी व माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, रायगड काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष सुनील थळे, अलिबागचे सरपंच अमित नाईक, अलिबाग काँग्रेसचे वैभव पाटील उपस्थित होते. रत्नागिरी व रायगड मध्ये प्रचंड पाऊस पडत असताना देखील या जिल्ह्यांतील काँग्रेसचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या लढवय्या व काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या आपल्या लाडक्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या श्रद्धांजली सभेत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *