बालग्राम मधील अनाथ, वंचीत बालकांना जीवनावश्यक वस्तूंसह शैक्षणिक साहित्याचे वाटप…

किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित बालग्राम मधील अनाथ, वंचीत बालकांना जीवनावश्यक वस्तूंसह शैक्षणिक साहित्याचे वाटप…

ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे हितचिंतक किशोर पाटील यांच्या छप्पनव्या वाढदिवसानिमित्त रविवारी अठरा जुलै रोजी पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या अनाथ, वंचित आणि आदिवासीं बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी चालविल्या जाणाऱ्या “बालग्राम” मधील बालकांना दैनंदिन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू ,वह्या,पेन, चित्रकला साहित्यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ह्या कार्यक्रमात अतिशय खडतर आयुष्यातून उन्नतीचा मार्ग शोधणाऱ्या किशोर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या आयुष्यातील अनुभव सांगून यश मिळविण्यासाठी कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही असे सांगितले. यावेळी सुनीता पाटील, नरेंद्र पाटील, मीनाक्षी पाटील, मनीषा पाटील, जयवन्त पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक उदय गावंड यांनी केले तर आभार जगदीश डंगर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश कोंडसकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील विश्वकर्मा, गोलू गुप्ता, राजेश पाटील, रुपेश रसाळ, योगिता डंगर यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *