केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस च्या दरवाढी विरोधात जाहीर निषेध मोर्चा..

आज शिवसेना युवासेना पनवेल विधानसभा यांच्या वतीने केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस च्या दरवाढी विरोधात जाहीर निषेध मोर्चा व आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड मा. शिरीष घरत साहेब या आंदोलनात सहभागी झाले व युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्यासाठी पाठिंबा दिला. त्या प्रसंगी शिवसेना खारघर शहर प्रमुख श्री. शंकरशेठ ठाकूर युवासेना रायगड जिल्हा विस्तारक ओंकार चव्हाण, युवासेना उपजिल्हा अधिकारी श्री. अवचित राऊत, रामचंद्र देवरे, संतोष गुजर, विधानसभा अधिकारी श्री. पराग मोहिते, युवतीसेने च्या जिल्हा अधिकारी सौ. योगिता पाटील, विभाग अधिकारी श्री. मनोज कुंभरकर यांच्या समवेत शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *