शिवसेना कामोठे शहरातील शेकडो पुरुषांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश..

शिवसंपर्क_अभियान-२०२१

शिवसेना कामोठे शहरातील शेकडो पुरुषांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश

खारघर :- आज शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री सन्मानिय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व त्यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख श्री. शिरीष घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे शिवसेना कामोठे शहरातील शेकडो पुरुषांनि शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या हाती शिवबंधन बांधून व त्यांना नियुक्ती पत्र देऊन शिवसेना पक्षात स्वागत केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. तसेच कामोठे उपशहर प्रमुख पदी श्री. विलास कामोठकार, विभाग प्रमुख पदी श्री. संतोष गोळे तसेच शाखा प्रमुख , उपशाखा प्रमुख व गट प्रमुख पदी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्या. पनवेल तालुका संपर्क प्रमुख श्री. योगेश तांडेल, शिवसेना कामोठे शहर प्रमुख श्री. राकेश गोवारी व कामोठे शहरातिल शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख गट प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *