संसद आदर्श ग्राम योजनेत खोपटा बांधपाडा-उरण, नेरळ-कर्जत व मोरबे-खालापूर या ठिकाणी स्वच्छता पंधरवडा शुभारंभ जल्लोषात साजरा करण्यात आला.

” संसद आदर्श ग्राम ही प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांची प्रेरणादायी योजना असून सार्वजनिक स्वच्छता हि काळाची गरज आहे. ” – श्री विजय कोकणे.

संसद आदर्श ग्राम योजनेत खोपटा बांधपाडा-उरण, नेरळ-कर्जत व मोरबे-खालापूर या ठिकाणी स्वच्छता पंधरवडा शुभारंभ जल्लोषात साजरा करण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांत संसद आदर्श ग्राम योजनेत खोपटा बांधपाडा-उरण, नेरळ-कर्जत व मोरबे-खालापूर या ठिकाणी स्वच्छता पंधरवडा शुभारंभ जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक महिलांनी व आदिवासी महिलांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात भाग घेत आपला सहभाग नोंदविला.

विशेषतः आदिवासी विभागात  असलेल्या आदिवासी बांधवांना व इतर गावातील जन सामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांची माहिती, परिसर स्वच्छता जनजागृतीची माहिती, पिण्याच्या पाण्याचंही असलेले स्रोत तसेच विविध भागांचे स्वच्छता अभियान, स्वतःच्या व कुटुंबियांच्या आरोग्य व आजार या  विषयक जन जागृती, कौशल्य विकास उपक्रम अंतर्गत रोजगार योजना इत्यादींची माहिती देण्याच्या उद्देशाने व रोजगार निर्मिती करत महिलांचे सक्षमीकरण करत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उददेशाने जन शिक्षण संस्थान रायगड यांच्या मार्फत  दि. 15 जूलै, 2021 ते 30 जुलै 2021 या कालावधीत  संसद आदर्श ग्राम योजनेत स्वच्छता पंधरवडा सामाजिक, आर्थिक, स्वच्छता सर्वेक्षण मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांची प्रेरणादायी योजना असलेली संसद आदर्श ग्राम योजनेत स्वच्छतेची शपथ घेण्यात आली, सामाजिक सर्वेक्षण आणि वृक्षारोपण देखील करण्यात आले. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत नेरळ कर्जत व मोरबे खालापूर सामाजिक, आर्थिक व स्वच्छता सर्वेक्षण मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम स्वच्छतेवर आधारीत कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कौशल्या वर आधारित विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी सामाजिक सर्वेक्षण आणि वृक्षारोपण देखील करण्यात आले. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत संसद आदर्श ग्राम ग्रुप ग्राम पंचायत खोपटा बांधपाडा-उरण येथे दि 17 जूलै 2021 रोजी सामाजिक, आर्थिक व स्वच्छता सर्वेक्षण मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम स्वच्छतेवर आधारीत कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून संसद आदर्श ग्राम ग्रुप ग्राम पंचायत खोपटा बांधपाडा-उरण यांच्या संयुक्त विद्यामानाने येथे स्वच्छता पंधरवडा जल्लोषात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमा प्रसंगी मोफत लिक्विड हॅन्डवॉश, सॅनिटायझिंग स्प्रे शिकवण्यात आले. कापडी मास्क, कापडी पिशव्या, सॅनिटरी पॅड यांचे देखील वाटप करण्यात आले.

 भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंर्तर्गत स्कील से समृद्ध स्वच्छता कार्यक्रम राबवित असतांना वरील ठिकाणी सदर उपक्रम जन शिक्षण संस्थान रायगड यांनी ‘‘ स्वच्छता  पंधरवडा " हा कार्यक्रम राबविला त्यात जन शिक्षण संस्थान रायगडचे मा. संचालक श्री विजय कोकणे  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *