शिवसेनेच्या शिव संपर्क 2021 अभियानाला ग्रामीण भागातून सुरवात..

शिवसेनेच्या शिव संपर्क 2021 अभियानाला ग्रामीण भागातून सुरवात.
पनवेल, दि.17 (वार्ताहर)- शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख शिरीष घरत व जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल ग्रामीण भागातील मौजे नितलस,खैरणे, वावंजे, कुत्तरपाडा,चिंध्रण, चिंचवली, शिरवली,आंबे, मौजे महालुंगी, मोबेॅ, खानाव, वाकडी,केवाळे,हरिग्राम,या ग्रामीण भागातील शिवसैनिक, पदाधिकारी व जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिव संपर्क अभियान दौरा आयोजित करण्यात आला होता.
शिव संपर्क अभियान दौऱ्यात उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या समवेत भरत पाटील, शिवसेना संघटक पनवेल तालुका, दिपक निकम, शिवसेना विधानसभा संघटक, एकनाथ म्हात्रे, शिवसेना ग्रामीण तालुका प्रमुख, योगेश तांडेल, कुंभारकर, शशीकांत भगत, दत्ता फडके, शिवसेना संघटक, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक, तसेच युवा सैनिक शिव संपर्क अभियानात सहभागी झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील समस्या जाणून घेतल्या तसेच काही ठिकाणी तात्काळ उपाययोजना केल्या.

शिव संपर्क अभियानात सहभागी झालेले उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या समवेत भरत पाटील, शिवसेना संघटक पनवेल तालुका, दिपक निकम, शिवसेना विधानसभा संघटक, एकनाथ म्हात्रे, शिवसेना ग्रामीण तालुका प्रमुख, योगेश तांडेल, कुंभारकर, शशीकांत भगत, दत्ता फडके आदी उपस्थितहोते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *