तहसील कार्यालयात अरेरेरावीची भाषा करण्याऱ्या महिला कर्मचारी यास समज द्यावी, क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन ची मागणी..

तहसील कार्यालयात अरेरेरावीची भाषा करण्याऱ्या महिला कर्मचारी यास समज द्यावी,
क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन ची मागणी..
पनवेल प्रतिनिधी : शुभांगी पवार

पनवेल : अरेरावीची भाषा करणाऱ्या आणि उद्धट उत्तरे देणाऱ्या पनवेल तहसील कार्यालयातील महिला कर्मचारीला समज देण्यात यावी याविषयीचे निवेदन क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन मार्फत तहसीलदार साहेब यांना देण्यात आले..
उपरोक्त विषयास अनुसरून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, पनवेल तहसील कार्यालयात कर्मचारी वर्गांचा मनमानी कारभार चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. तहसील कार्यालयात कामास्तव येणाऱ्या नागरिकांशी अरेरेवाची भाषा तसेच उद्धट उत्तरे देऊन काम करण्यास नकार देत उद्या या, अश्याप्रकारचे बोलणे करण्यात येत असल्याचे आम्हां क्रांतीज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या लक्षात आले आहे. दि.२९/६/२०२१ रोजी असाच एक प्रकार सौ. रुपालीताई शिंदे यांच्या समोर प्रत्यक्ष घडला असून यात एक गरीब महिला तिच्या कामास्तव आलेली असता तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचारी अव्वल कारकून यांनी त्या महिलेशी हुज्जत घालत, तिला उलट उत्तरे देत तिला उद्या या असे सांगण्यात आले, आता वेळ संपली आहे २ वाजले. मात्र २ वाजण्यासाठी १० मिनिट असतानाही काम चुकार पणा करून त्या महिलेशी असभ्य भाषेत तिला जाण्यास सांगितले. मग ह्या अश्या कर्मचाऱ्यांना याठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे का? असा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मग तुम्ही पगार कोणत्या कामाचा घेता? कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी किंवा व्यक्तींशी सौजण्याने बोलणे तुमचे कर्तव्य आहे ते तुम्ही का पाळत नाही? तहसील कार्यालयात कामानिमित्त जास्त गर्दी असते मग प्रत्येकालाच अश्या प्रकारची उत्तरे देण्यात येतात यावरून हे सिद्ध होते आहे. तरी महोदय यांनी यावर विचार करावा ही नम्र विनंती फॉउंडेशन मार्फत करण्यात आली आहे. तसेच घडलेल्या प्रकाराचे आपण लवकरात लवकर यावर कारवाई करावी व संबंधित कर्मचारीला समज देण्यात यावी अशी फॉउंडेशन ची मागणी आहे.
सदर निवेदनाची दखल घेत आम्हाला ह्यावर केलेली कारवाईची माहिती पत्राद्वारे द्यावी अश्या स्वरूपाचे निवेदन देण्यात आले. आता यावर काय कारवाई होते हे महत्वाचे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *