युनाटेड ब्रेव्हरीज यांच्याकडून पनवेल महापालिकेस रुग्णवाहिका


पनवेल महापालिका आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी आणि वैद्यकिय अधिकारी डॉ. पूनम जाधव यांच्या प्रयत्नातून तळोजा येथील युनाटेड ब्रेव्हरीज लिमिटेड या कंपनीने महानगरपालिकेस आज एक रुग्णवाहिका दिली. ‘बेसीक लाईफ सपोर्ट कार्डियाक ‘ ही रुग्णवाहिका कंपनीच्या 2021-22 च्या सामाजिक दायित्व निधीतून(सीएसआर फंड) देण्यात आली आहे.

पनवेल महापलिका क्षेत्रातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून आयुक्त श्री .गणेश देशमुख विविध उपाय योजना राबवित आहेत. त्याच बरोबर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नातून कळंबोली येथे कोविड समर्पित रूग्णालय सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयात तसेच उपजिल्हा रुग्णालय, कोण येथील इंडिया बुल्स विलगीकरण केंद्र याठिकाणी महापालिका कार्यक्षेत्रातील सहा नोडमधील रूग्ण उपचारासाठी येत असतात. रूग्णांना ने-आण करण्यासाठी सध्या पालिकेकेडे एकुण २२ रुग्णवाहिका आहेत. यातील १७ रुग्णवाहिका या भाडेतत्वावर आहेत. त्यामुळे युनाटेड ब्रेव्हरीज यांच्याकडून महापालिकेस मिळालेल्या रुग्णवाहिकेचा पालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांसाठी मोठा उपयोग होणार आहे.

यावेळी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, नगरसेवक बबन मुकादम, हरेश केणी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, युनाटेड ब्रेव्हरीज लिमिटेडचे माणिक चोप्रा,अमृतअम्बूलकर, अवीनाश रणनवरे ,अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *