ट्रेलरच्या धडकेत दोघे जखमी



एका ट्रेलरच्या धडकेने मोटार सायकलस्वार जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जे.डब्ल्यू.आर च्या समोर बॉम्बे पाडा कडे जाणार्‍या रस्त्यावर घडली आहे.
ट्रेलर चालक राजेशकुमार भारती हा त्याच्या ताब्यातील ट्रेलर घेवून भरधाव वेगाने बॉम्बे पाडा कडे जाणार्‍या रस्त्यावरुन जात असताना त्याने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत मोटार सायकलवरील सिद्धार्थ मोरे (35) व शितल मंडल हे दोघेही खाली पडून जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *