पनवेल तालुक्यातील विवाहिता बेपत्ता


पनवेल तालुक्यातील शिरढोण पाडा येथील राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक विवाहिता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सौ.संगीता बाळकृष्ण नाईक (३०) उंची ५ फूट २ इंच, रंग गोरा, चेहरा उभट, डाव्या हाताच्या पोटरीवर आतील बाजूस संगीता व बाळकृष्ण असे गोंदण आहे. नाक सरळ असून अंगात हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस व चॉकलेटी रंगाची शाल तसेच पायात काळ्या रंगाची स्लिपर आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.हवा.आर.आर.पागरे यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *