रास्त भाव धान्य दुकानदारांच्या एकजुटीचा विजय- भरत पाटील

पनवेल दि. 06 (वार्ताहर): पनवेल तालुका तसेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील केंद्र सरकारच्या वतीने एप्रिल, मे व जुन महिन्याकरिता स्थगित करण्यात आलेली ई पॉस प्रणाली पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र राज्याप्र्रमाणे रायगड जिल्ह्यात विशेेषतः पनवेल तालुक्यात कोरोनाचा धोेका कायम असल्यानेे दुकानदार व लाभार्थी यांंना सदर प्रणालीचा वापर केल्यास पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने रास्त भाव धान्य दुकानदारांंनी एकत्रितपणे नव्याने पारित केलेल्या आदेशाविरुद्ध विरोधात दंड थोपटले. शासनाच्या या दुकानदारांच्या जीवाशी खेळणार्‍या निर्णयाविरोधात भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व दुुकानदारांनी हा अन्यायकारक आदेश मागे न घेेतल्यास धान्य वितरण न करण्याचा इशारा दिला. त्याची दखल घेेवून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मे महिन्याकरिता रेशनद्वारे अन्नधान्य वाटप करताना ई पॉस मशिनची अट शिथील केल्याने भरत पाटील यांनी राज्य शासनाचेे विशेेष आभार मानलेे.

देशभरात कोरोेनाने थैमान घातले असताना ई पॉस मशिनद्वारे धान्य वितरण केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होवू शकतो. यासाठी दुुकानदारांनी विरोेध दर्शविला होता. व त्याचे वृत्त दै.रायगड नगरीने प्रसिद्ध केले होते. परंतु केंद्र शासनाने राज्यावर दबावतंत्र वापरुन पुन्हा ई पॉॅस मशिनद्वारे धान्य वितरण करण्याचेे आदेश दिलेे. पनवेलमध्ये दोन दुकानदार तर मुंबईमधील एका रास्त भाव धान्य दुकानदार व त्याच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योेजनेंतर्गत वाटप होत असलेल्या लाभार्थ्यांचा ई पॉस मशिनवर अंगठा घेण्यात येतो. मात्र ई पॉस मशिनवर लाभार्थ्याचा अंगठा देेताना व वाटप करणार्‍या दुकानदाराचा जवळून संपर्क येत असल्यानेे कोरोना साथीचा संंसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. ई पॉस मशिनवर अंगठा घेेताना सोेशल डिस्टन्सिंग पाळणेे खुप कठीण होईल व संसर्ग होण्याचा धोका खुप वाढू शकतो. त्यामुळे दुकानदारांनी ई पॉस मशिनवर धान्य वितरण न करण्याचा निर्णय घेेतला. तसेच ई पॉसची सक्ती केल्यास दुकानदारांना एक कोटी तर कर्मचार्‍यांना 50 लाखाची विमा पॉॅलिसी मिळत नाही तोपर्यंत धान्य वितरण न करण्याचे रास्त भाव धान्य दुकानदार वेल्फेअर असोेसिएशनचेे अध्यक्ष भरत पाटील यांनी शासनाला कळविले होते. त्याची शासनाने दखल घेवून ई पॉस अट शिथील करण्यात आल्याने भरत पाटील यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *