महावीर इंटरनॅशनल, पनवेल यांच्या तर्फे पनवेल महानगरपालिकेस पाच ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर

महावीर इंटरनॅशनल फाऊंडेशन व कन्टेनर कार्पोरेशन इंडिया यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागास ५ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटरचे हस्तांतरण करण्यात आले. महावीर इंटरनॅशनल ही सामाजिक भान जपणारी संस्था असून आजवर त्यांनी अनेक ठिकाणी मदत केली आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपचारांसाठी महापालिकेच्या कोविड समर्पित रुग्णालयास त्यांनी पाच लिटरचे पाच ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर दिले आहेत. कोविड रुग्णांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. यावेळी महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, आयुक्त श्री. गणेश देशमुख, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी उपस्थित होते. महावीर इंटरनॅशनल पनवेलचे अध्यक्ष विजय भवसार, सपन बर्धन, विजय भवसार,आर.एस.पोतदार,मंगेश परूळेकर,अजय दवे,नरेंद्र जैन,अजय अग्रवाल, शिंदे, बेरा,डॉ. विजया लोहारे, डॉ. पुनम जाधव उपस्थित होते.

ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर म्हणजे नेमके काय?

आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली असून बऱ्याच जणांमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या रुग्णालये किंवा घरी आयसोलेट झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑक्सिजन कंसंट्रेटरची मदत घ्यावी लागत आहे.
ऑक्सिजन कंसंट्रेटर हे एक पोर्टेबल ऑप्शन आहे. हे कंसंट्रेटर एका जागेवरुन दुसरीकडे नेणं अत्यंत सोपं आहे. हे एक मेडिकल डिव्हॉइस असून त्यात ऑक्सिजन मास्क नेसल ट्यूब आणि अन्य आवश्यक वस्तू जोडलेल्या असतात. कंसंट्रेटर विजेवर चालणार यंत्र असल्यामुळे ते २४ तास काम करते. परंतु, यातून एका मिनिटात केवळ ५ ते १० लीटरच ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो. ऑक्सिजन कंसंट्रेटर हे एक अशा प्रकारचे उपकरण आहे की ते वातावरणातील ऑक्सिजन वेगळे करून त्याचा पुरवठा करतो. फिलिप्स, इनवा केअर, इनोजेन, एयर सेप इत्यादी कंपनी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर उपलब्ध करून देत आहे.

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर नेमके कोणासाठी फायदेशीर…

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर ते गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी तेवढे फायदेशीर नाही कारण अशा रुग्णांना जास्त फ्लो च्या ऑक्सिजन ची आवश्यकता असते. जर एखाद्या वेळेस आवश्यक वेळेस ऑक्सिजन सिलेंडर मिळाला नाही तर ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल 85 आहे अशा रुग्णांसाठी ही वापर करता येतो.परंतु जर रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल 85 पेक्षा कमी असेल तर अशा रुग्णांना याचा फायदा होत नाही. अशा रुग्णांना सिलेंडर अथवा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन सपोर्टचीच आवश्यकता असते.
ऑक्सिजन कंसंट्रेटरचे दोन प्रकार आहेत. पहिला कंटिन्यूअस पल्स आणि दुसरा फ्लो कंसंट्रेटर. यामध्ये फ्लो कंसंट्रेटर एकदा चालू केल्यानंतर जोपर्यंत आपण तो बंद करत नाही तोपर्यंत तो सुरु राहतो. तर, पल्स कंसंट्रेटर रुग्णाच्या ब्रिदींग पॅटर्ननुसार काम करतो. म्हणजे जर रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ लागला तर हे कंसंट्रेटर काम सुरु करतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *