राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुरेखा सिकरी यांचे निधन

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचे आज निधन झाले आहे. सुरेखा सिकरी यांची तब्येत दीर्घकाळापासून ठीक नव्हती. त्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. सुरेखा सिकरी यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुरेखा यांनी आपल्या अभिनयातून दमदार भूमिका सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

अनेक मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. सुरेखा यांनी ‘बधाई हो’  आणि ‘बालिका वधू’ या मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका पार पाडल्या आहेत. बालिका वधू या मालिकेतील त्यांच्या ‘दादी सा’  या भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांच्या मनात चांगले स्थान मिळाले. त्यांना ‘तमस’, ‘मम्मो’ आणि ‘बधाई हो’ चित्रपटासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुरेखा सिकरी यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून अभिनयाचे शिक्षण घेतले. १९८९ मध्ये सुरेखा यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्या  आता 75 वर्षांच्या होत्या. त्यांना गेल्यावर्षी ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्या आजारावर त्यांनी मात केली. आज शुक्रवारी सकाळी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *