खारघरमध्ये सापडला बेवारस मृतदेह


खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आर ए कॅम्प समोरील रोडवर मेट्रो बीच खाली पापडीचा पाडा येथे एका बेवारस इसमाचे प्रेत सापडून आले आहे. खारघर पोलीस या इसमाच्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत. या इसमाचे अंदाजे वय ४५ असून त्याचा नाव पत्ता माहीती नाही.
त्याची उंची साडेपाच फूट, नाक बसके, केस कुरळे वाढलेले आहेत. त्याचा बांधा सडपातळ असून, अंगात लाल रंगाचा टीशर्ट आणि काळ्या रंगाचे ट्रॅक पॅन्ट परिधान केलेले आहे. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर कनम असे गोंदलेले आहे. या मृत्यू ईसमाबाबत अधिक माहिती असल्यास खारघर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *