सावधान, पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !


जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर तीन महिन्यानी तपासल्या जाणार्‍या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल तालुक्यात जानेवारी ते जून महिन्यात तपासलेल्या 200 नमुन्यांपैकी 42 नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे जीवन असणारे पिण्याचे पाणी हेच आजाराचे कारण ठरू शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पनवेल तालुक्यातील दूषित निघालेल्या गावांतील पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याने ग्रामपंचायतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. पाणी नमुने दूषित आढळलेल्या गावांतील जलस्रोत शुद्धिकरण करण्याची विशेष मोहिम हाती घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाकडून दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जातात. मात्र दूषित आढळून येत असलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो आणि नागरीक आजारी पडू शकतात.
घेतलेले पाणी नमुने – 200
दूषित पाणी नमुने -42
योग्य पाणी नमूने -158

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळुन प्या !
ग्रामीण भागात बहुतांश पाणीपुरवठा करणार्‍या योजनांच्या विहिरी या नदी, ओढ्यांच्या काठी आहेत. त्यामुळे या नदी व ओढ्यांना पूर आल्यानंतर पुराचे पाणी या विहिरींमध्ये जाते. ग्रामीण भागात खाजगी विहिरी, बोअर या जलस्रोतांजवळ मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचते. त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी पिताना ते पाणी उकळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

कोरोनामळे नमुने घेण्यास अडचण!
आरोग्य विभागाकडून दर तीन महिन्याला ग्रामीण भागातील गावातील पाणी नमुने तपासले जातात. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रत्येक गावातील पाणी नमुने तपासण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *