सामाजिक उपक्रमांनी होणार सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांचा वाढदिवस साजरा


करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांचा १९ जुलै रोजी वाढदिवस साजरा होणार आहे. हा वाढदिवस सामाजिक उपक्रमणाने साजरा करण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज व श्री समर्थ हेल्थ केअर क्लीनिक करंजाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तपासणी शिबीर, त्याचबरोबर वृक्ष लागवड, आणि करंजाडे वसाहतीतील कोरोना काळात उल्लेखनीय काम करणार्‍याना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.

करंजाडे ग्रामपंचातीचे कार्यतत्पर सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांचा वाढदिवस कोरोना काळ असल्यामुळे उत्साहामध्ये साजरा न करण्याचे आंग्रे यांनी जाहीर केले आहे. मात्र करंजाडे वसाहतीमध्ये वाढ़दिसानिमिताने १९ जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत, रायगड जिल्हा प्राथमिक शाळा करंजाडेमध्ये भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शुगर लेवल, रक्त गट, दातांची तपासणी, हाडांची ढिसूळता घनता, स्त्रीरोग तंज्ञाकडून तपासणी व मार्गदर्शन, नेत्र तपासणी यामध्ये डोळे तपासणी, नंबर तपासणे, मोतीबिंदू झालेल्या रुग्नांचे रोटरी मार्फत मोफत मोतीबिंदू सर्जरी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वसाहतीतील परिसरातील ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोना या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता केलेल्या उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे वाढदिवसानिमिताने पोलीस, फ्रंटलाईन कर्मचारी, सफाई कामगार, नर्स, आया व वार्डबॉय इ व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आरोग्य शिबिरामध्ये येणार्‍या नागरिकांनी मास्क शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच शिबिरामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *