उद्या दुपारी दहावीच्या विद्यार्थांचे निकाल होणार जाहीर

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्वच सेवा ठप्प झाल्या होत्या. याशिवाय शालेय शिक्षणालाही ऑनलाइन स्वरुप प्राप्त झाले होते. दहावी ऑनलाईन निकाल उद्या शुक्रवारी दि.१६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. दहावी निकालाबाबतची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.”महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ. १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल.” असे वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १२ मे रोजी राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून इयत्ता १० वीचा निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम होता. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाची तारीख घोषित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *