३२ वर्षीय महिला बेपत्ता..


कोणाला काहीही न सांगता पडघे- कोळवाडी येथील ३२ वर्षे महिला राहत्या घरातून निघून गेली आहे. त्यामुळे ती हरवली असल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविता प्रबल दास, असे या महिलेचे नाव असून तिची उंची पाच फूट, रंग सावळा, केस काळे व लांब आहेत. तिने नाकात नथ, कानात सोन्याची बाळी, गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. तिच्या अंगात लाल रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाचे लेडीज आहे. तिला हिंदी आणि मराठी भाषा बोलता येते. या महिलेबाबत अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन टाकळे यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *