महिलांवरील अत्याचारा विरोधात कारवाई करण्याची पनवेल क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनची मागणी

दिनांक १४ -०६-२०२१ रोजी पनवेल तहसीलदार साहेब यांस निवेदन देण्यात आले.

आजच्या युगातील स्त्रिया ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून झटत असतात. मात्र ह्याच स्त्रियांना खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का? हा प्रश्न आज एकविसाव्या शतकात जगत असतानाही पडतोच आहे. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना महिला कुठेही सुरक्षित राहिली नाही. गाव आणि जिल्हा पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मेळावे आणि शिबिर आयोजित करून जनजागृती केली जात असली तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर होत आहे. ह्याच पार्श्वभूमीवर, पनवेल येथील सामाजिक कार्य करणाऱ्या आणि महिलांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या क्रांतीज्योत महिला विकास फाऊंडेशननी पनवेल तहसीलदार विजय तळेकर साहेब यांना ही परिस्थिती आटोकयात आणण्याची विनंती करण्यात आली.

महिलांवरील अत्याचार, शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींची छेडछाड करून विनयभंग करणे, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, असे अशा घटनामध्ये गेल्या काही दिवसात वाढ होताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोपींना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने राज्यातील मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या विकृतीने कळस गाठला असून, आरोपी मोकाट फिरत आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टातील केसेस प्राधान्याने मार्गी लावून लेकींना न्याय दिल्यास या प्रवृत्तींना आळा बसेल, अशी आशा आम्हा फाउंडेशनतर्फे निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. आपण यावर तातडीने अंमलबजावणी करावी व मोकाट फिरणाऱ्या, महिलांवर – तरुणीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना वेळीच आटोक्यात आणण्याची आवश्यकता आहे. ही सामाजिक कार्य करणाऱ्या व महिलांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशननी निवेदनाद्वारे विनंती केली आहे. हे निवेदन तहसीलदारांना सादर करताना क्रांतीज्योत महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष मा.सौ.रुपालीताई शिंदे , खजिनदार मा.सौ.किरण अडागळे, सदस्या मा.श्रीमती स्नेहा धुमाळसह पत्रकार गुरुनाथ भोईर आणि त्यांचे सहकारी इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *