रिक्षाच्या कर्जाचे हप्ते पुढे ढकलावे मुख्यमंत्र्यांना केली संतोष आमले यांनी पत्राद्वारे मागणी..

रिक्षाच्या कर्जाचे हप्ते पुढे ढकलावे मुख्यमंत्र्यांना केली संतोष आमले यांनी पत्राद्वारे मागणी

पनवेल/प्रतिनिधी :कोरोनाच्या सावटा खाली गेल्या वर्षा पासून पूर्ण जग जात आहे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे.लोकडाऊन हळू हळू उठवण्याचा प्रयत्न सुरु आहे परंतु अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत,त्यात रिक्षा चालक सुद्धा संकटात सापडला व्यवसाय नसल्याने अनेक रिक्षा चालकावर उपास मारीची वेळी आली, कुटूंब चालवायचं कस या चितेत रिक्षा चालक असून ,त्यात रिक्षा वर असलेले बँक फायनान्स चे कर्ज फेडायचे कसे त्यात थकीत हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जातो व्यवसाय कमी झाल्या मुळे कोरोना काळातील थकीत हप्ते भरायचे कसे या चिंतेने रिक्षा चालक खचून गेला आहे. कर्जापाई महाराष्ट्रात अनेक रिक्षा चालकाने आत्महत्या केल्यात, महाराष्ट्र शासनाने केलेली 1500रुपयांची मद्दत तोकडी असून . तरी महाराष्ट्र शासनाने कोरोना काळातील रिक्षावर असलेले बँक फायनान्सचे कर्जाचे हप्ते गेल्या वर्षा प्रमाणे आता ही पुढे ढकलण्याचे आदेश द्यावेत त्या मुळे सध्या रिक्षा चालकांना कर्ज फेडण्यास सोपे जाईल. अशी मागणी श्री.संतोष शिवदास आमले यांनी मुख्यमंत्री मा. श्री.उद्धव ठाकरे साहेब यांना पत्राद्वारे केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *