डॉ . भुषणकुमार उपाध्याय , अप्पर पोलीस महासंचालक यांच्या “ मृत्युंजय दुत ” या संकल्पनेमुळे महामार्ग पोलीस केंद्र..

डॉ . भुषणकुमार उपाध्याय , अप्पर पोलीस महासंचालक यांच्या “ मृत्युंजय दुत ” या संकल्पनेमुळे महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पेच्या हद्दीतील महामार्गावर वाचले २२ जणांचे प्राण
पनवेल, दि.13 (संजय कदम)-महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक डॉ . भुषणकुमार उपाध्याय यांनी महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील तसेच अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना लवकरात लवकर कशी मदत मिळेल या धर्तीवर ०१ मार्च २०२१ पासुन मृत्युंजय दुत ही संकल्पना संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पे नवी मुंबई यांचे वतीने महाराष्ट्रातील महत्वाच्या मुबई – पुणे महामार्गावर मार्च २०२१ पासुन मृत्युंजय दुत ही संकल्पना राबविण्यात येत असून आत्ता पर्यंत या दूतांनी 22 जणांचे प्राण वाचविले आहेत.           महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पे च्या हद्दीमध्ये एकुण ३६ मृत्युंजय दुत कार्यरत आहेत . या संकल्पनेमध्ये महामार्गाच्या लगतच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते , स्थानिक सरकारी संस्था व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी , ढाबे , पेट्रोल पंपाचे कर्मचारी व केन चे कर्मचारी यांचा मृत्युंजय दुत मध्ये सामावेश केलेला आहे. या सर्व मृत्युंजय दुत यांना अजिवली ग्रामीन रूग्णालयाचे डॉ . प्रभाकर पटेल व त्यांचा स्टाफ तसेच आयआरबीचे डॉ . रोख यांच्या मार्फत महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पे यांचे वतीने सर्व मृत्युंजय दुत यांना महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पे याठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे व एखादा अपघात झाल्यास कसा प्रतिसाद दयायचा याचे प्राथमिक प्रशिक्षण दिले गेले आहे. देवदुतांना स्ट्रेचर व प्राथमिक उपचारासांठीचे साहित्यही पुरविण्यात आलेले आहे. याशिवाय महामार्गावरील रूग्णालयांची नावे व त्यांचे संपर्क क्रमांकही देण्यात आलेले आहेत. महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पेच्या हद्दीमध्ये ०१ मार्च ते १० जुन दरम्यान एकुण ०९ अपघातामध्ये ११ लोकांचा मृत्यु झालेला असुन या अपघातामध्ये महामार्ग पोलीस व मृत्युंजय दुत यांनी तात्काळ जखमींना हॉस्पिटल मध्ये दाखल केल्याने एकुण १७ अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे सुभाष पुजारी, सहा . पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पे यांनी सांगितले. कोट-राज्यभरात म्हणुन एकुण ५ हजार १२ मृत्युंजय दुत (स्वयंसेवक) नियुक्त करण्यात आलेले आहेत. ते स्वयंसेवक अपघातग्रस्तांना तात्काळ मदत देत आहेत. महाराष्टात एकुण ९८ राष्ट्रीय महामार्ग व ३ ९ ८ राज्य महामार्ग आहेत. संपुर्ण महामार्ग पोलीसांकरवी प्रत्येक महामार्गच्या जवळच्या स्वयंसेवकांचे मृत्युंजय दुत पथक तयार करण्यात आलेले आहे . त्यांना प्रशिक्षण , स्ट्रेचर व प्रथमोपचार साहित्य असे देण्यात आलेले आहे . या योजनेला नागरीकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळत असुन मृत्यु दरात घट झालेली आहे . नजिकच्या भविष्यकाळात ही योजना संजीवनी ठरणार आहे. – डॉ . भूषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलीस महासंचालक, ( वाहतुक ) , 
महाराष्ट्र राज्य डॉ . भुषणकुमार उपाध्याय , अप्पर पोलीस महासंचालक , ( वाहतुक ) , महाराष्ट्र राज्य यांचे संकल्पनेतुन मृत्युंजय दुत ही योजना अपघाता मधील जखमी झालेल्या नागरीकांकरीता तातडीची मदत मिळुन त्यांचे प्राण वाचविण्याकरीता व शारीरिक हानी मर्यादित राहण्यासाठी उपयुक्त ठरत आहे . -डॉ . दिगंबर व्रधान , पोलीस अधिक्षक , महामार्ग पोलीस , ठाणे , रायगड परिक्षेत्र 
अपघातात मदत करीत असताना नागरीकांना कायदेशीर बाबीची असणारी भिती लक्षात घेवुन महामार्ग पोलीस यंत्रणेने सजग नागरीकांना मृत्युंजय दुत नावाची ओळख निर्माण करून दिलेली आहे . याचे सकारात्मक परिणाम दिसुन येत आहेत.  गुरूनाथ साठेलकर , मृत्युंजय दुत ( अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था )
         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *