पनवेल शहर पोलिसांना डॉ. राजेश गांधी यांच्या सहकाऱ्यांनी केले सी व्हिटामिन गोळ्यांचे वाटप
पनवेल दि.30 (वार्ताहर)- कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे गेल्या पावणे 2 महिन्यांपासून पोलिस वर्ग हा रस्त्यावर 24 तास सर्वसमान्य नागरिकांसाठी सतर्क आहे. यात 3 पोलिस कर्मचारी शहिदसुद्धा झाले आहेत. परंतु आपल्या जीवाची किंवा आपल्या कुटूंबियांची काळजी न करता रस्त्यावर सेवा देणाऱ्या पोलिस बांधवांसाठी गुरूवारी भिंगारी येथील डॉक्टर राजेश गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सी व्हिटामिन गोळ्यांचे वाटप केले.
पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्याशी चर्चा केल्यावर सातत्याने कर्तव्य बजावित असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज असते. सध्याच्या मे महिन्यांत सी व्हिटामिनची शरिराला जास्त गरज असते. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी अंगात प्रतिकार शक्तीसुद्धा महत्वाची आहे. त्यासाठी आज पनवेल शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे सी व्हिटामिनचे पॅकेट्स विक्रांत पाडळे, अक्षय शेटे. तन्मय शेटे, नितेश चव्हाण, आशिष परदेशी यांनी सुपूर्त केले. त्याचप्रमाणे वाहतूक शाखा व इतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनासुद्धा सी व्हिटामिनचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.