पटवर्धन वाडा येथील स्टॅम्प काँक्रीटीकरण कामाचे नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या हस्ते भूमीपूजन..

पटवर्धन वाडा येथील स्टॅम्प काँक्रीटीकरण कामाचे नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या हस्ते भूमीपूजन..
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून नागरीकांना समसम्या जाणून त्या साडविण्याचे तसेच त्यांना विविध सुवीधा देण्याचे काम सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नगरसेविका रुचीता लोंढे यांच्या नगरसेविक निधीमधून प्रभाग क्रमांक 19 मधील पटवर्धन वाडा येथील गल्लीमध्ये स्टँम्प काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भुमीपूजन नगरसेविका रुचीता लोंढे यांच्या हस्ते करण्यात झाले.  
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील नगरसेवाकांच्या माध्यामातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मधील पटवर्धन वाडा या गल्लीमध्ये 5 साोसायट्यांमध्ये असून, या ठिकाणच्या नागरीकांच्या रस्त्यासंदर्भात अणेक समसम्या होत्या. त्यापार्श्‍वभुमीवर नगरसेविका रुचीता लोंढे यांच्या नगरसेवक निधीमधून पटवर्धन वाडा येथील गल्लीमध्ये स्टँम्प काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामांचे मान्यवरांच्याहस्ते भुमीपूजन करण्यात आले. या वेळी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, नंदा ओझे, शरद सोमण, योगेश जोगळेकर, अनिमेष पटवर्धन, दशरथ चोरघे, श्री निजमपुरकर, तुषार कप्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *