उत्तम तरकसे पर्यावरण रक्षक सन्मानपत्र द्वारा सन्मानित..

उत्तम तरकसे पर्यावरण रक्षक सन्मानपत्र द्वारा सन्मानित वैश्विक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वेद फाउंडेशन द्वारा १००८ तुळसी रोपांचे आज वितरण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस दलातील श्री उत्तम तरकसे, आयकर विभागातील श्री विलास देवळेकर, शैक्षणिक विभागातून सौ. मंजू सराठे, सामाजिक क्षेत्रातून श्री मंगेश रासम इत्यादी गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. संस्था अध्यक्ष श्री स्वप्नील वाडेकर यांच्या संकल्पनेतून पुढील सप्ताह गरजवंतांना तसेच मध्यमवर्गीयांना तुळशीचे औषधी रोप वितरित करण्यात येणार आहे नवी मुंबई येथील श्री तरकसे यांचे सामाजिक तथा पोलीस दलातील योगदान पाहता त्यांना याप्रसंगी पर्यावरण रक्षक सन्मानपत्र द्वारा गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *